• Sat. Sep 21st, 2024

लेकीच्या डोळ्यांदेखत आई-वडीलांचा दुर्दैवी शेवट; रस्त्यातच सोडला जीव, घटनेनं नागपूर हळहळलं

लेकीच्या डोळ्यांदेखत आई-वडीलांचा दुर्दैवी शेवट; रस्त्यातच सोडला जीव, घटनेनं नागपूर हळहळलं

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मुलीसमोरच आई-वडील ठार झाले. या भीषण अपघातात मुलगीही जखमी झाली. ही घटना वर्धा मार्गावरील जामठा परिसरात घडली.

काय घडलं?

दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) व सारिका दिलीप लेंडे (वय ४०, दोन्ही रा. संताजीनगर, बुटीबोरी) अशी मृतकांची नावे आहेत. लावण्या (वय १३) ही जखमी असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हे बुटीबोरीतील केईसी इंटरनॅशनल कंपनीत कार्यरत होते. लावण्या ही मानसिक आजारी आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दिलीप व सारिका तिला रुग्णालयात दाखविण्यासाठी मोटारसायकलने (एमएच-४०-बीव्ही-२५२७) नागपूरकडे येत होते. जामठा परिसरातील बेलाज सर्व्हिस गोदामासमोर ट्रकने (यूपी-१५-डीटी-१५५६) मोटारसायकलला धडक दिली. दिलीप आणि सरिका एकीकडे तर लावण्या दुसरीकडे फेकली गेली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने दिलीप व सारिका गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. नागरिकांनी धाव घेतली. एका नागरिकाने हिंगणा पोलिसांना कळविले.

कबड्डी स्पर्धेहून परतताना हरले ‘आयुष्याचा सामना’; भीषण अपघातात दोन खेळाडूंचा जागीच मृत्यू
माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दिलीप व सारिका यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच दिलीप यांचा मुलगा अमृत हॉस्पिटलमध्ये आला. आई-वडिलांच्या मृत्यूचा जबर धक्का त्याला बसला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed