• Mon. Nov 25th, 2024

    सख्खे भाऊ, पक्के चोर! ट्रान्सपोर्ट कंपनीला तब्बल अडीच लाखांचा चुना, बातमी वाचून शॉक व्हाल

    सख्खे भाऊ, पक्के चोर! ट्रान्सपोर्ट कंपनीला तब्बल अडीच लाखांचा चुना, बातमी वाचून शॉक व्हाल

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कंपनीने पाठविलेला मालाचे वितरण करून त्या मालाचे पैसे कंपनीला जमा न करता; तसेच आपल्या भावाला कंपनीत मॅनपॉवर सप्लायर म्हणून लावले. या दोन्ही सख्ख्या भावांनी संगणमत करून कंपनीचा विक्री केलेल्या मालाचे पैसे आणि कर्मचाऱ्यांचे पगार असा जवळपास अडीच लाखांचा चुना कंपनीला लावल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अजय गणेश जडपे आणि विजय गणेश जडपे (दोघेही रा. गांधीनगर, दौलताबाद) या दोघांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    या प्रकरणी एनटेक्स ट्रास्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे सीनिअर लीगल कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे (वय ३४, रा. हिराबाई कोटकर चाळ, रूपेश कॉलनी, दत्तवाडी आकुर्डी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची कंपनीकडून एफएमसीजी व ग्रोसरी डिलिव्हरी करण्याचे काम करते. या कंपनीत टीम लिडर म्हणून अजय गणेश झडपे नोकरीस होता. त्यांच्याकडे सिंधीसिरजगाव मध्ये कामाला होता. अजय झडपे याने कंपनीच्या गोडावूनमध्ये देण्यात आलेला मालाचे पैसे भरलेले नसल्याची माहिती समोर आली. अजय झडपे याने एक लाख २६ हजार ९६८ रुपयांचा अपहार केल्याचे सांगितले. अजय झडपे याचा भाऊ विजय झडपे याला कंपनीत मॅनपॉवर सप्लायर म्हणून लावले. अजय याने विजय हा त्याचा सख्खा भाऊ असल्याची माहिती कंपनीला दिली नाही. विजय झडपे याने कामगाराची पगार एक लाख १५ हजार रुपये न देता, या रक्कमेचा अपहार केला.
    स्वस्तात फॉरेन ट्रिपचं गाजर, लकी ड्रॉच्या नादात दाम्पत्याचं मोठं नुकसान, काय घडलं?
    या प्रकरणात दोन्ही बंधुनी मिळून १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या काळात दोन लाख ४१ हजार ९६८ चा अपहार केला. या प्रकरणी मयूर शिंदे यांच्या तक्रारीवरून अजय झडपे आणि विजय झडपे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचीन प्रताप वायाळ करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *