• Tue. Nov 26th, 2024

    पटेलांनी पुस्तकात पक्ष सोडणे ते ईडीनं घरात कार्यालय का उघडलं यावर लिहावं : शरद पवार

    पटेलांनी पुस्तकात पक्ष सोडणे ते ईडीनं घरात कार्यालय का उघडलं यावर लिहावं : शरद पवार

    पुणे : खासदार प्रफुल पटेल यांनी कर्जत येथील अधिवेशनात बोलताना पुस्तक लिहीणार असल्याचं म्हटलं होतं. २००४ मध्ये देखील भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता, या संदर्भात देखील दावा पटेल यांनी केला होता. शरद पवारांनी या दाव्यावर उत्तर दिलं आहे. प्रफुल पटेल यांनी जे सांगितलं ते मला स्वीकारणं शक्य नाही, असं त्यांना सांगितलं होतं. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, माझी काही तक्रार नसेल असं पटेल यांना सांगितलं होतं. माझा नकार असल्यानं ते थांबले आणि निवडणुकीत ते पराभूत झाले, असं शरद पवार म्हणाले.

    निवडणुकीत प्रफुल पटेल यांचा पराभव होऊनही पक्षानं केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची उमेदवारी दिली. पराभूत उमेदवाराला पक्षानं केंद्रात मंत्रिपद दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे, असं शरद पवार म्हणाले.
    अजित पवारांनी लोकसभा मतदारसंघाची नावं सांगितली, जयंतराव शड्डू ठोकत म्हणाले ‘है तय्यार हम’!
    मी वाट बघतोय पुस्तकाची, असं शरद पवार म्हणाले. पटेल यांनी अलीकडे लोक पक्ष का सोडून जातात यावर एक चॅप्टर लिहावा, असं शरद पवार म्हणाले. पटेलांच्या घरामध्ये ईडीचं ऑफिस आलं हे ऐकायला मिळतं त्यावर चॅप्टर लिहावा. नवी दिल्लीतील घर आहे त्यातील काही मजले ईडीनं का ताब्यात घेतले यावर एखादा चॅप्टर पटेलांनी लिहावा, आमच्या देखील दाव्यात भर पडेल, असं शरद पवार म्हणाले.
    नवीन पक्ष का नाही काढला? दादांच्या त्या व्हिडीओवरून आव्हाडांचा हल्ला, मुश्रीफांकडून प्रत्युत्तर

    अजित पवारांच्या वक्तव्याचा त्रास होतो का? शरद पवार म्हणाले…

    अजित पवारांच्याकडून होणाऱ्या वक्तव्यांचा त्रास होतो का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर शरद पवार यांनी अजिबात त्रास होत नाही असं म्हटलं. माझ्या पक्षाचे अध्यक्ष ज्यांना उमेदवारी देतील तो उमेदवार बारामतीची निवडणूक लढवेल, असं शरद पवार म्हणाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची वाट पाहूया, असं शरद पवार म्हणाले. अजित पवारांनी काल अनेक गोष्टी सांगितल्या त्यात सत्य किती होतं असत्य किती होतं, असा सवाल शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला हे सर्वांना माहिती आहे. २०१९ चा पहाटेचा शपथविधी हा पक्षाच्या धोरणाचा भाग नव्हता, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
    राजीनामा दिला तर तो मागं घेण्याची माझ्या स्वत:मध्ये कुवत, शरद पवारांनी अजित पवारांचा तो दावा खोडून काढला
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed