नागपूर : किरकोळ वादातून शहरात हत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना नागपुरच्या पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात समोर आली आहे. भाजी विकण्याची दुकान लावण्याचा वादातून केक विक्रेता दुकानदाराने भाजी विक्रेत्याला डोक्यात काठीने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. या प्रकरणी रात्री उशिरा पारडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभुदयाल सराटे (४०) असे मृत भाजीविक्रेतेचा नाव आहे. तर गजानन वडणकर (३६) असे आरोपीचे नाव आहे. वडणकर यांचे पारडी पुनापुर रोडला केकचे दुकान आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुदयाल सराटे हे पारडी परिसरात भाड्याने राहत होते. तो घराजवळच भाजी विकत होता. आरोपी गजानन वडणकर याचेही केकचे दुकान तिथेच होते. प्रभुदयाल अनेकदा वाडणकर यांच्या केकच्या दुकानासमोर भाजी विक्रीचे दुकान लावत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद ही झाले. मंगळवारी रात्रीही प्रभुदयाल सराटे यांनी वडणकर यांच्या दुकानासमोर भाजीची दुकान लावली. वारंवार सांगूनही यानी आपल्या दुकानासामोर भाजी विक्री करत असल्यामुळे सराटे आणि वडणकर यांच्यात वाद झाला.

मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वडणकर आणि सराटे यांचात वाद झाला. गजानन वडणकर यानी प्रभुदयाल सराटे यांना शिवीगाळ केली. यानंतर सराटे यांनीही गजानन वडणकर याला शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांचातला वाद वाढत गेला. याचा राग येऊन गजानन वडणकर यानी प्रभुदयाल सराटे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रभुदयाल सराटे गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहीती मिळताच पारडी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन आरोपी केक विक्रेत्याला अटक करण्यात आले आहे.