नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलांमध्ये झालेल्या भांडणातून ८ वीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून एका टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अल्पवयीन मुलाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने नाशिक शहरातील अंबड परिसरात असलेल्या स्वामीनगर येथील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा राजा गब्बर सिंग (वय १६) या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला या टोळक्याने विल्होळी जवळील एका स्टोन खडी क्रशरजवळ नेत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजा सिंह याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. राजा याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच टोळक्याने त्याचा मृतदेह राजूर बहुला या परिसरातील एका निर्जन भागात नेऊन टाकला.

राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास केला असता नाशिक शहराजवळ असलेल्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी जात शहानिशा केली असता अपहृत राजा सिंग याचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने मात्र नाशिकच्या अंबड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील अंबड परिसर हे वाढत्या गुन्हेगारी मुळे कायमच चर्चेत राहिलेले आहे.
दरम्यान, या हत्या प्रकरणी अंबड पोलिसांनी शुभम करंजकर, प्रवीण गोवर्धने, अमन खरात, निखिल पगारे, संतोष वाघमारे, सिद्धार्थ दाभाडे, भय्या साळवे एकूण ७ संशयित आरोपींना अटक केली आहे. या सातही आरोपींना कोर्टात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.