अजहर हा मूळ बेंगळुरूतील रहिवासी आहे. त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीला सात अपत्ये आहेत. दोन वर्षांपूर्वी अजहर हा १० वर्षीय मुलीला घेऊन अरमान याच्या अथर्वनगरी तीन येथील निवासस्थानी आला. मुलीला येथेच सोडून तो परत गेला. मुलगी घरकाम करायची. काही दिवस ती परिसरातील मुलांसोबत खेळली. नंतर तिला घरातीलच स्नानगृहात डांबून ठेवण्यात येत होते. कामात चूक केल्याच तिला सिगारेट, गरम चाकू व तव्याचे चटके देण्यात यायचे. अजहर हा मुलीचे शारीरिक शोषणही करायचा.
२९ ऑगस्टला मुलीला स्नानगृहात बंद करून तिघेही बेंगळुरूला गेले. तिला खायला बिस्कीटचे पाकिट दिले. दरम्यान वीज बिल जमा न केल्याने महावितरणचे कर्मचारी अर्थवनगरी येथे आले. त्यांनी अरमानच्या घराची वीज कापली. वीज गेल्याने मुलगी घाबरली. चमच्याने तिने स्नानगृहाचा दरवाजाची कडी उघडली व घराबाहेर आली. चौकीदाराला ती दिसली. घरी कोणी नाही तू येथे कशी आली,अशी विचारणा चौकीदाराने केली. ती रडायला लागली. शेजारी जमले. एका महिलेने तिला घरी नेले. तिची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विमानतळावरून अमरानला अटक केली.त्यानंतर अन्य तिघांनाही गजाआड करण्यात आले. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सुमारे तीन महिन्यांपासून हिना ही पसार होती. हिना बेंगळूरूत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त एम.सुदर्शन यांना मिळाली. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगला हरडे, साहाय्यक उपनिरीक्षक गजेंद्रसिंग ठाकूर, हेडकॉन्स्टेबल श्याम, शरीफ शेख, विलास, ऋषिकेश व अश्विनी खोडपेवार यांचे पथक तिथे गेले. हिनाला अटक करून नागपुरात आणले.
Read Latest Maharashtra News And Marathi News