• Sat. Sep 21st, 2024

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed