• Mon. Nov 25th, 2024

    धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, नाकावर ठोसा मारला, पतीचा मृत्यू

    धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, नाकावर ठोसा मारला, पतीचा मृत्यू

    पुणे: वानवडी येथे पत्नीच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पतीचा नाकावर ठोसा मारल्याने नव्हे; तर धारदार शस्त्राने मारहाण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनपसंत भेटवस्तू दिली नाही, या कारणावरून झालेल्या भांडणातून पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.
    ‘तू माझा फोन फेकल्याने नुकसान’; विधिसंघर्षित तरुणाचा मुलाजवळ वाद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य
    या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी वानवडीत घडली होती. निखिल पुष्कराज खन्ना (३६) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. डॉ. पुष्कराज खन्ना यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पत्नी रेणुका खन्ना (३८) तिच्यावर गुन्हा दाखल करून वानवडी पोलिसांनी तिला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सप्टेंबरमध्ये रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. मात्र, निखिल तिला दुबईला घेऊन गेला नाही. पाच नोव्हेंबरला लग्नाचा वाढदिवस झाला. त्या वेळीही त्याने रेणुकाला मनपसंत भेटवस्तू दिली नव्हती. त्याचा तिला राग होता.

    बोंड अळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडल्या

    रेणुकाला भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी डिसेंबरमध्ये दिल्लीला जायचे होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. वादादरम्यान, रेणुकाने ठोसा मारल्याने निखिलचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नोंद आहे. मात्र, तत्पूर्वी निखिलने रेणुकाच्या छातीवर बसून मारहाण केली. त्यानंतर रेणुकाने रागाच्या भरात निखिलला चार ते पाच ठोसे मारल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. रेणुकाने निखिलला धारदार शस्त्राने मारल्याची शक्यता आहे. याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी बाजू मांडली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed