रब्बीच्या स्वप्नावर कोसळले आभाळ; नाशिक जिल्ह्यात पावसाचा धिंगाणा, गारपिटीने पिकांची माती
जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीमुळे निफाड, येवला, चांदवड तालुक्यात द्राक्षे, कांदा, कांदा रोपे, सोयाबीन, मका यांचे प्रचंड नुकसान झाले. चांदवड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून, पोल्ट्री फार्म, शेडनेटसह कोंबड्याही दगावल्या आहेत. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, घोटी परिसरातील सोंगून ठेवलेला भात पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. चाराही भिजल्यामुळे आगामी काळात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.