बीडमधील घटनेचं आम्ही समर्थन केलेलं नाही, तुम्ही सहानुभूती घेण्यासाठी तिथं गेला होता, असं देखील जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, असंही जरांगे म्हणाले. लोकांनी हक्कांनी गावबंदी केली आहे, त्यांना अधिकारपदाचा दुरुपयोग करायचा आहे असं देखील जरांगे म्हणाले.
रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर नव्हे तर राज्यातील विविध लोकं भेटण्यात आले होते. छगन भुजबळ यांनी अनेक पक्ष मोडले आहेत आतापर्यंत असंही जरांगे म्हणाले. आमच्या लोकांनी मार खाल्ला, महिलांनी गोळ्या खाल्ल्या, कोणताही संबंध कशाशी जोडू नका, असं जरांगेंनी म्हटलं. राहुल बेदरे याच्या सोबत माझेही फोटो आहेत. महाराष्ट्रात कोणाचेही कोणासोबत फोटो असू शकतात, असं जरांगेंनी म्हटलं.
आमच्या अंतरवाली सराटीतील लोकांवर अन्याय झाला आहे. गृहमंत्र्यांनी दिलगिरी केली आहे. अंतरवाली सराटीतील लोकांना सरकारनं अटक का केली, असा सवाल जरांगे यांनी केला आहे. अटकेची कारवाई कशामुळं झाली याची जालन्यात गेल्यानंतर माहिती घेऊन आणि बाजू मांडेन, असं जरांगे म्हणाले.
सारथीच्या मुलांचे काय हाल आहेत ते सारथीच्या मुलांना विचारा, असंही जरांगे म्हणाले. आमचं आरक्षण आहे, आम्ही घेणार आहे, असंही जरांगेंनी म्हटलं. लायकी संदर्भातील वक्तव्य राज्यकर्त्यांसाठी होतं. छगन भुजबळ विषय भरकटवत आहेत. आम्हाला संविधान कर्त्यांचा आदर आहे. ओबीसींना द्यायला आम्ही विरोध केलेला नाही.
छगन भुजबळ यांनी आजच्या सभेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली का असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News