• Mon. Nov 25th, 2024

    उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…

    उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…

    कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ज्या भागातील पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत त्या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करत ती इतरत्र वळविण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले.
    पुण्याची मेट्रो तातडीने झाली पाहिजे; अजित पवारांचे सूचना, ससून ड्रग्ज प्रकरणातील दोषींवरही केलं वक्तव्य
    स्मार्ट सिटीतील उड्डाणपुलाच्या पिलरच्या कामासाठी मागील जवळपास वर्षभर स्टेशन परिसरातील वाहतूक वळवण्यात आली असून स्टेशन परिसरात केवळ रिक्षांना प्रवेश दिला जात आहे. आता पिलर उभारणीचे काम पूर्ण झाले असून या पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत हे काम केले जाणार असल्याने या काळात रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार वल्ली पीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्ली पीर चौकात प्रवेश बंद करण्यात आल्याने ही वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील.

    शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याने रडवलं; जिनिंग-प्रेसिंग उद्योग धोक्यात, तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ

    भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छित स्थळी जातील. तर कल्याण रेल्वे स्टेशनकडून वल्लीपूर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल आणि अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावे वळण घेऊन गुरुदेव हॉटेल मार्गे येथे इच्छित स्थळी जातील. तर भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावे वळण घेऊन गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमी मार्गे मार्गस्थ होतील, अशी माहिती वाहतूक विभागाचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed