२४ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कपेवंचा येथील रहिवासी असलेला रामजी हा तरुण आपल्या शेतात काम करीत होता. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही सशस्त्र माओवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांनी तिघांची हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ नोव्हेंबर ला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील माजी पोलीस पाटील लालसू वेडदा आणि शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कपेवंचा येथील रामजी आत्राम या तरुणाची हत्या केली. मागील दोन वर्षांपासून शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असून लागोपाठ घडवून आणलेल्या हत्यासत्राने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
एकीकडे माओवाद्यंविरुद्ध पोलिसांनी शोध मोहीम तीव्र करून माओवाद मिटवण्यासाठी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात पोलिस मदत केंद्र,पोलिस स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले असेल तरी माओवाद्यांची दहशत मात्र,कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.या घटनांमुळे सध्या दक्षिण गडचिरोलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
