मागील विधानसभा निवडणुकीतही योगेश कदम आणि संजय कदम असा सामना झाला होता. मात्र योगेश कदम यांनी मागच्या निवडणुकीत जवळपास तेरा हजार मतांची आघाडी घेत विजय संपादन केला होता. राष्ट्रवादी असलेल्या संजय कदम त्यांनी दीड वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला होता.
रामदास कदम यांचे विरोधक मानले जाणारे भास्कर जाधव आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी संजय कदम यांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.त्यामुळेआता आमदार योगेश कदम यांना आगामी विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी संजय कदम यांना राजकीय बळ देण्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यात देण्यात आले आहेत. संजय कदम यांना भास्कर यादव यांचे मोठे राजकीय पाठबळ मिळणार असल्याचे स्पष्ट असून भास्कर जाधव यांनी आपल्या या पूर्वीच्या कार्यक्रमांमधूनही संजय कदम यांच्यासाठी तयारी करा असेच अनेकदा म्हटले होते.
दापोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. मात्र दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आदित्य ठाकरे यांनी खेड येथे जाऊन संजय कदम यांच्या घरी त्यांची भेट घेतली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा आमचे दापोलीचे भावी आमदार त्यांच्या घरी आपण आलो आहोत, असा उल्लेख करत शिवसेना ठाकरे गटाचे पुढचे उमेदवार संजय कदम असतील असेही यामुळे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि संजय कदम यांच्या लढतीत कोण बाजी मारणार हे विधानसभा मतदारसंघातील मतदार ठरवतील. याशिवाय दोन्ही उमेदवारांना त्यांच्या मित्रपक्षांचं सहकार्य कसं मिळतं यावर देखील निकाल अवलंबून असेल.
Read Latest Maharashtra News And Marathi News