परभणी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना झालेली ओळख त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी ३८ वर्षीय पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत काळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ मध्ये पोटाचा त्रास जाणवत असल्याने महिलेला रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. बाजुला असलेल्या बेडवरील रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीशी महिलेची ओळख झाली. उपचारादरम्यान सदर व्यक्ती महिलेला देखील औषध गोळ्या आणण्यासाठी मदत करत होता. यानंतर सन २०१८ मधील जानेवारी महिन्याच्या शेवटी हा व्यक्ती महिलेच्या घरी आला. त्याने महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता संबधीत व्यक्तीने टाळाटाळ केली. सप्टेंबर २०२३ पर्यंत सदर प्रकार सुरु होता.

याच दरम्यान आरोपीने महिलेकडून उसणे म्हणून २ लाख रुपये देखील घेतले. नोव्हेंबर २०२३ मध्ये पिडीतेने आरोपीला २ लाख रुपये परत मागितले असता संबधिताने शिवीगाळ करत महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, उसणे दिलेले पैसे मागितल्यानंतर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन प्रशांत काळे नामक व्यक्तीवर नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.