• Sat. Sep 21st, 2024
लाल कांदा खातोय भाव, उन्हाळ कांद्याचीही आवक शिल्लक; वाचा आताचे नवे दर

निफाड : तब्बल एक महिना उशिराने निफाड तालुक्यातील पिंपळगाव आणि लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारातही लाल कांद्याची आवक वाढली आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात भाववाढ झाली असताना शेतकऱ्यांना मात्र कांद्याच्या दरातील तेजीचा लाभ होताना दिसत नाही.

किरकोळ बाजारात गेल्या १० ते १२ दिवसांत कांद्याच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली असताना कांदा पिकवणारा शेतकरी मात्र अजूनही गेल्या महिनाभरापूर्वीच्या दरातच कांदा लिलावात विकत असल्याचे चित्र आहे. बारा दिवसांच्या सुटीनंतर लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील कांद्याच्या लिलावाने पुन्हा गजबजले आहेत. यावर्षी लांबलेला पावसामुळे दसऱ्यादरम्यान येणाऱ्या लाल कांद्याचे आगमन महिनाभर लांबले होते. आता लाल कांद्याची आवक वाढली असली तरी मागणी आणि पुरवठा यावर परिणाम करणारी असेल. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदाही बाजारात अजून दाखल होतोय.

लासलगाव बाजार समिती (मंगळवार)

उन्हाळ कांदा दर (रुपयांमध्ये)
किमान २,०००

कमाल ३,८४७

सरासरी ३,२००

लाल कांदा दर

किमान २,७५२

कमाल ४,६४७

सरासरी ४,२००

उन्हाळ कांद्याची ४१७ वाहने, तर लाल कांद्याची ८४ वाहने

अंदाजे ८,५०० क्विंटल आवक

पिंपळगाव बाजार समिती (मंगळवार)

उन्हाळ कांदा दर (रुपयांमध्ये)
किमान २,८५१

कमाल ४,४००

सरासरी ३,४००

लाल कांदा दर

किमान ३,१००

कमाल ४,८००

सरासरी ३,९००

उन्हाळ कांद्याची ४०६ वाहने, तर लाल कांद्याची १७८ वाहने

अंदाजे १०,५०० क्विंटल आवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed