• Sat. Sep 21st, 2024

मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कराल तर महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे,’ असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ‘सरसकट कुणबी दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घुसवा, याला टोकाचा विरोध करणार आहे,’ असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथे आले असताना शेंडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेंडगे म्हणाले, ‘मराठा समाजाची सुरू असलेली आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे; परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. आंदोलनामुळे आज सामाजिक विभाजन सुरू आहे. मराठा ओबीसी समाजातील सुरू असलेला वाद मिटलेला नाही. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी एल्गार मेळावे, मोर्चे काढण्यात येत आहेत. शांततेने, लोकशाहीच्या मार्गाने ओबीसी समाजाचे आंदोलन असेल.’

‘येत्या २६ रोजी हिंगोलीत एल्गार मेळावा होत आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात मेळावे होणार आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिमंत केली, तर ओबीसी समाज सरकारला खाली खेचेल. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे. त्याची चुणूक एल्गार मेळाव्यातून राज्याने, देशाने पाहिली आहे. मराठा समाजाला सामाजिकरित्या मागासलेपण सिद्ध करावे लागेल. केवळ प्रमाणपत्र घेऊन मागास होता येणार नाही,’ असेही ते म्हणाले.

कुणी अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था किंवा आयोग काम करत नसतो; राज्य मागासवर्ग आयोगाचा मनोज जरांगेंना टोला

शेंडगे म्हणाले, ‘अनेक आयोगांनी, सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मागासलेपण नाही म्हणून सांगितले. त्यामुळे ५० टक्क्याच्या आत कुणबीचे दाखले घेऊन मराठा समाजाला ओबीसीत प्रवेश करता येणार नाही. तसा प्रयत्न सरकारकडून झाला तर प्रत्येक अद्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, ओबीसीला निधी याबाबत संघर्ष सुरूच राहणार आहे.’ या वेळी टी. पी. मुंडे, मनोज घोडके आदींची उपस्थिती होती.

मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण, उदयनराजे भोसले म्हणाले ज्यांची मागणी असेल…

हिंगोलीतील पटोले, बावनकुळेंना निमंत्रण

‘हिंगोली येथे २६ नोव्हेंबर रोजी एल्गार मेळावा होणार आहे. हिंगोलीचा मेळावा अधिक मोठा होईल. राज्यातील सर्व पक्षातील नेते उपस्थित राहणार असून, या एल्गार मेळाव्यात उपस्थित राहावे यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निमंत्रण दिले आहे,’ असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

अंबडमध्ये ओबीसींची ऐतिहासिक सभा; भुजबळ – वडेट्टीवार – पंकजा मुंडे उपस्थित राहणार, प्रकाश शेंडगेंची माहिती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed