सरकारकडून पोकळ हमीभावाची घोषणा केली जाते पण सध्या कापसाचे आणि सोयाबीयने दर पडलेले आहेत. २०१३ मध्ये ११ हजार रुपयांना कापूस विकला जात होता मात्र, सध्या दोनपट भाव देण्याची घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते वडेट्टीवारांनी केला.
धान कापणी सुरू झाल्यानंतर सरकार काही घोषणा करणार का आणि शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची मागणी करणार का? असा सवाल त्यांनी केला. स्थानिक पातळीवर इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोणताही अडथळा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोग भाजपच्या खिशात
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना नोटीस पाठविल्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. वास्तविक, निवडणूक आयोग भाजपचे झाले आहे अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
राम मंदिरात मोफत दर्शनाच्या नावाने मत मागणाऱ्यांना नोटीस का देत नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे. धार्मिक भावनेतून मते मागणे हे संविधानात आहे काय का आचारसंहितेत आहे? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला. कारवाई करायची असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांना नोटीस देण्यात आली पाहिजे. भीतीपोटी हा प्रकार घडल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या राजकारणात विष पसरवणाऱ्यांना उखडून काढण्याचा इंडिया आघाडीचा निर्णय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News