प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेरणा स्थान असते तसे माझ्याही मनात अजित पवार आहेत आणि कुठे तरी मनाला नेहमी वाटत की आपल्या आवडीचा माणूस कणखर नेतृत्व हे मुख्यमंत्री पदावर असावे त्यासाठीच ही पदयात्रा काढली आहे, असं सागर पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुळजापूरच्या आईचे दर्शन घेऊन प्रेरणा घेतली होती , त्याच अनुषंगाने माझ्या मनातील इच्छा घेऊन आईला साकडे घालण्यासाठी नेरुळ ते तुळजापूर अशी पायी पदयात्रा काढली आहे, या यात्रेमध्ये ५ ते १० तरुण सहभागी होणार असल्याचे सागर पवार यांनी सांगितले.
सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्याला आपला नेता राज्याच्या मुख्य पदावर बसावा असे नेहमीच वाटत असते. त्यासाठी कार्यकर्ते देवाला नवस बोलतात, कुणी शपथ खातो अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. नेरूळ मधील सागर पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे. आजपासून ही यात्रा नेरूळ मधून सुरू होऊन ती १२ दिवस चालणार असून १२ दिवसांनी तुळजापूर या ठिकाणी पोहोचणार आहे.
सदर पदयात्रेत १२ ते १५ जण सामील असणार आहेत. यावेळी तुळजा भवानीला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना अजित पवार कसे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहेत हे सांगितले तसेच गावोगावी या पदयात्रे चे स्वागत होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. या अनोख्या पदयात्रेची चर्चा सर्वत्र होत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News