• Sat. Sep 21st, 2024

नौसेना दिवसासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान सिंधुदुर्गात येणार, चिपी विमानतळावर महत्त्वाची सुविधा सुरु

नौसेना दिवसासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान सिंधुदुर्गात येणार, चिपी विमानतळावर महत्त्वाची सुविधा सुरु

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. यावेळीचा नौसेना दिन हा सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथे साजरा होणार आहे. मालवण राजकोटमध्ये होत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे. त्याची अंतिम जय्यत तयारी सुरू आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मान्यवर येणार आहेत. तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मान्यवरांच्या उपस्थित नौसेना दिन साजरा होणार आहे. 1 ते 4 डिसेंबर 2023 अस नौसेना दिनाचा सोहळा असणार आहे. नौदलाच्या कवायती समुद्रामध्ये असणार आहेत. तारकर्ली, देवबाग, मालवण या समुद्रामध्ये विशेष म्हणजे आम जनतेला कवायती बघता येणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावरील प्रशासन सज्ज झाले आहे.

सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच या विमानतळावरून नाईट लँडिंग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी डीजीसीए कडून ग्रीन सिग्नल मिळणे अपेक्षित आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह महनीय व्यक्ती मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. फ्लाय 9 ही विमान कंपनी याठिकाणी विमानसेवा देण्यास सज्ज झाली आहे.

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नव्हती मात्र ती सुविधा सुरू करणे महत्त्वाचे होते. अखेर प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस निर्णय होवून आवश्यक त्या सुविधा पूर्ण करुन घेण्यासाठी विकासक आयआरबी कंपनीला सक्त सुचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकिरी किशोर तावडे यांनी सुध्दा याबाबत प्रत्यक्ष विमानतळाला भेट देऊन कंपनीला सुचना दिल्या होत्या. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत यांनी सुध्दा याप्रश्नी पाठपुरावा ‘केला होता. अखेर या विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच दिल्ली येथील डीजीसीएचे पथक या विमानतळावर येऊन सुविधेची तपासणी करून ही सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देणार आहे.

व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर; वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed