मिळालेली माहिती अशी की, पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे राहणारे जोतीराम सदाशिव कुंभार आणि नायको सदाशिव कुंभार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघेही बुधवारी रात्रीच्या सुमारास ओढा परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, याच परिसरात वन्यजीव मोठ्या प्रमाणात असल्याने शिकारी चोर हे येथे तलाव परिसरात वन्य प्राण्यांचे शिकार करण्यासाठी विजेचा शॉक देऊन शिकार केली जाते. बुधवारी रात्री देखील अशाच प्रकारे शिकारी या परिसरात विजेच्या तारा लावून त्यात वीज प्रवाह दिला होता.
यावेळी दोघा भावांचा पाय या तारांना लागला आणि दोघांनाही विजेचा झटका लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांची ओढ्यालगत शोधा शोध सुरू केली. मात्र, नातेवाईकांना ते आढळून आले नाहीत. त्यानंतर नातेवाईकांनी दोघेही बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तपास सुरू असताना या ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकराची शिकार करण्यासाठी विद्युत तारा लावला होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान अधिक चौकशी केली असता दोन्ही कुंभार भावांचा तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच आपले बिंग फूटू नये म्हणून शिकारी चोरांनी दोन्ही मृतदेह पावनगडावरून जंगलात टाकून दिले. दरम्यान, आज चार दिवसानंतर या दोन्ही मृतदेहांना जंगलातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी सहा संशयतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात खळबळ उडाली असून राक्षी येथील ग्रामस्थांनी पन्हाळा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News