• Sat. Sep 21st, 2024

कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे: मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केसेस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता ११ महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी असतात. त्यामुळे आता ऑक्टोबर पर्यंत वेळ नाही. मतदारसंघ बघायचा, कामे बघायची की कोर्टाच्या केसेस पाहायच्या. पवार साहेब कोर्टात स्वतः जातात मात्र, जनाची नाही मनाची तरी आहे आणि ८० वर्षाच्या वडिलांना एकटे जाऊ देईल का कोर्टात असे म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली हरेंगे या जितेंगे ये बाद मे देखेंगे मगर लढेंगे जरूर ! असा टोला सुळे यांनी लगावला.

कोर्टाची पायरी चढलोय आता उतरायचे नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खरे आहोत. निवडणूक आयोग कधी निकाल देते माहिती नाही. ते किती दिवस चालेल या बद्दलही माहित नाही. वकिलांबरोबर आता राहायची सवय झालीय. बरेच दिवस वकील नाही भेटले तर कसं तरी वाटतं असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नगरविकास विभागाचे सचिव असिम गुप्तांविरुद्ध अवमान याचिका, गुप्तांना कारणे दाखवा नोटीस, नेमकं प्रकरण काय?

दोन्ही बाजूचे वकील माझे दोस्त आहेत. त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते आणि लढते आणि जेवण एका बरोबर करते त्यामुळे लोक म्हणतात की हे काय चाललंय? पण मी त्यांना प्रेमाने म्हणते आपली दोस्ती एक तरफ आणि आपली लढाई एक तरफ. एकतर वकील देखील पवार साहेबांना भेटल्यानंतर सॉरी म्हणतात. तिथले एक वकील हे सदानंदचे मित्र आहेत ते देखील मला येऊन भेटतात. त्यामुळे मतदारांनो मला समजून घ्या मी मतदारसंघातून गायब झाले नाही अशी मिश्किल टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरात केली. त्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावात बोलत गावकऱ्यांशी सवांद साधताना बोलत होत्या .

शरद पवारांची प्रकृती, अजितदादांसोबतची भेट, पुन्हा एकत्र दिसणार?; सुप्रिया सुळेंनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed