• Wed. Mar 18th, 2026

    Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताय? मुंबई-कोकण मार्गावर धावणार विशेष एक्स्प्रेस, असं आहे नियोजन

    Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताय? मुंबई-कोकण मार्गावर धावणार विशेष एक्स्प्रेस, असं आहे नियोजन

    Mumbai To Kokan Summer Special Trains 2026: मुंबई ते कोकण मार्गावर दोन विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. कसं आहे नियोजन? पाहा वेळापत्रक

    मुंबई- कोकण मार्गावर विशेष एक्स्प्रेस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मुंबई ते कोकण मार्गावर विशेष एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. गाडी क्रमांक ०११७१/७२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगाव आणि ०१११९/२० लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव या मार्गावर एप्रिल ते जूनदरम्यान विशेष रेल्वे धावणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण मंगळवार, १७ मार्चपासून खुले झाले आहे.

    गाडी क्र. ०११७१ सीएसएमटीहून मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सुटेल आणि दुपारी ३.१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११७२ मडगावहून दुपारी चार वाजता सुरू होईल आणि सीएसएमटीला पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. १६ एप्रिल ते ११ जूनदरम्यान दर गुरुवारी विशेष गाडी धावणार आहे. विशेष गाडीला २२ एलएचबी डबे असणार आहेत.

    Maharashtra TimesMumbai Local: मोटरमन स्टेशनच विसरला, ट्रेन वेगाने पुढे, प्रवाशांमध्ये गोंधळ; मुंबई लोकल स्टेशनवरील घटनेची चर्चा
    गाडी क्र. ०१११९ एलटीटीहून मध्यरात्रीनंतर १२.५५ वाजता निघेल आणि दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११२० मडगावहून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि पहाटे ३.३० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही गाडी १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी धावणार आहे. विशेष गाडीला २१ एलएचबी डबे असणार आहेत.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: पाच वर्षांत वीजदर कमी; दरवर्षी 1.2 टक्के घटवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
    दोन्ही विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमाळी स्थानकांवर थांबतील. विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेबसाइटवर आहे .

    फुकट्यांकडून २.४१ कोटी वसूल
    कोकण रेल्वेने विनातिकीट, अयोग्य तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध राबवलेल्या तपास मोहिमेत फेब्रुवारीमध्ये ४१ हजार प्रवाशांवर कारवाई केली. त्यातून दोन कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. आगामी उन्हाळी सुट्टीत ही मोहीम व्यापकस्तरावर सुरू राहणार असल्याचे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा