• Wed. Mar 18th, 2026

    Pune News: पुण्यात आणखी एका ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाला मंजुरी, महात्मा फुले चौकातील कोंडी फुटणार; 24 महिन्यात काम पूर्ण करणार

    Pune News: पुण्यात आणखी एका ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाला मंजुरी, महात्मा फुले चौकातील कोंडी फुटणार; 24 महिन्यात काम पूर्ण करणार

    Mahatma Phule Chowk Flyover: पुण्यात सावित्रीबाई फुळे विद्यापीठ चौकानंतर आता आणखी एका दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे मुंढवा, केशवनगर ते खराडी बायपास या मार्गावरील कोंडी फुटणार आहे.

    म.टा. प्रतिनधी, पुणे: अत्यंत वर्दळीच्या व सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या मुंढवा, केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावरील महात्मा फुले चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावरून वाहने, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. यासाठी १२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

    या उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुलामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी बायपास परिसरातील सततची कोंडी दूर होईल. येथील प्रवास वेगवान होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पांचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्याचा कालावधी वगळून २४ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, असे भिमाले म्हणाले.

    Maharashtra TimesBullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांवर ‘स्टेशन प्लाझा’, ‘लास्ट माइल कनेकटीव्हीटी’ला चालना; टॅक्सी, बसला थेट जोडणी

    मेट्रोच्या विस्तारालाही मान्यता

    ‘मेट्रोला पुणेकरांची पसंती मिळत असून, मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुंढवा, केशवनगर ते खराडी मार्गावरही मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे महामेट्रोशी चर्चा करून या पुलात मेट्रोचाही अंतर्भाव केल्याचे भिमाले यांनी सांगितले. उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी आदीसह तडजोडीने १२६ कोटी ६३ लाख ३६,१०३ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. नळस्टॉप येथील पुलाच्या धर्तीवर हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल असेल. पहिल्या स्तरावरून वाहने, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावेल, असे प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.

    काळेबोराटेनगरला भुयारी पादचारी मार्ग

    हडपसर-काळेबोराटेनगर रस्त्यावरील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर काळेबोराटेनगर येथे पादचारी भुयारी मार्ग बांधण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वे विभागामार्फत होणाऱ्या या कामासाठी तब्बल पाच कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार असून, हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाईल. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

    हडपसर आणि काळेबोराटेनगर येथील रेल्वे गेट पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आहे. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या धावतात. त्यामुळे अनेकदा रेल्वे गेट बंद ठेवावे लागते. यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा म्हणून पादचारी पूल बांधण्याची मागणी जोर धरत होती. महापालिकेने या पर्यायाची चाचपणी केली होती. मात्र, हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे लक्षात आल्याने पादचारी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला आहे. रेल्वे विभागामार्फत हा भुयारी मार्ग उभारला जाईल. या कामासाठी पाच कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा