• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्र्यांमधील कॉमनमॅनचं दर्शन, एकनाथ शिंदेंनी मिसळीवर मारला ताव; बिलही स्वतःच भरलं

मुख्यमंत्र्यांमधील कॉमनमॅनचं दर्शन, एकनाथ शिंदेंनी मिसळीवर मारला ताव; बिलही स्वतःच भरलं

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळी निमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ पासूनच मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमांना भेटी देत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ठाण्यातील प्रसिद्ध आशा मामलेदार मिसळीचा अस्वादही त्यांनी यावेळी घेतला. त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, रविंद फाटक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा होते. मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचं बिल मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलं आणि आपण कसे कॉमन मॅनच आहोत हे दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या वागणूकीमुळे उपस्थित शिवसेना कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांचा जयजयकार केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज ठाण्यात तरूणाईचा जल्लोष दिसतोय सर्वांना मी शुभेच्छा दिल्यात. राज्यातही सर्वत्र दिवाळी निमित्त उत्साहाचं वातावरण आहे. सर्वत्र उत्साह जल्लोष बघायला मिळतोय. राज्यातील सर्व संकट अरिष्ट दूर व्होवो. दिवाळी सुरू झाली, काल फुसका बार आला पण तो वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यु टर्न घ्यावा लागला. दिवाळीच्या दिवसांत आशा प्रकारे विघ्न घालायला कोणत्याही राजकीय नेत्याने येणं चुकीचं आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांनी शक्तीचं दर्शन दाखवलं आणि आपले सण परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना ग्राम पंचायतमध्ये जनतेने जागा दाखवली. आज त्यांना ७ व्या क्रमांकावर पाठवलं, उद्या त्यांचा १० वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही आरोपांना मी कामातून उत्तर देईन, असंही ते म्हणाले.

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, ५० ते ६० मजूर अडकल्याची भीती
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed