• Sat. Sep 21st, 2024
पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी, नागरिकांची गर्दी झाल्याने बाजारात उत्साह

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीनिमित्त पणत्या, बोळके यासह विविध पुजा साहित्यासह बाजारपेठेतील दुकाने सजली आहे. गुलमंडी, टीव्ही सेंटर, श्री गजानन महाराज मंदिरसह शहराच्या इतर भागात या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या दिवाळी सणात लक्ष्मीपूजन हा सर्वांत महत्त्वाचा दिवस. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असा योग आज (रविवारी) एकत्र जुळून आला आहे. या निमित्ताने गुलमंडी, औरंगपुरा, सुपारी हनुमान मंदिर परिसर, टीव्ही सेंटर, बजरंग चौक, श्री गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर, चिकलठाणा, पीर बाजारासह शहर परिसरातील बाजारपेठा पूजा साहित्याने सजल्या आहेत. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, फळे, विड्याची पाने, लक्ष्मीची मूर्ती, फोटो, केरसुणी, बोळके, लाह्या, बत्तासे आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ग्राहकांची लगबग वाढली असून, शनिवारी नागरिकांची मोठी वर्दळ बाजारात दिसून आली.

CM शिंदे ४ राज्यांमध्ये भाजपचा प्रचार करणार; ‘लाल डायरी’वाल्या राजेंद्र गुढांचं काय होणार?
बाजारात आकर्षक पणत्याही दाखल झाल्या असून त्यास चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यासह पूजेला बसण्यासाठी कॉटन, सिल्क, वेलवेट विविध प्रकारांतील आसने बाजारात उपलब्ध असून लक्ष्मीचे फोटो, स्टिकर्सही बाजारात आले आहे. यासह अत्तर, उदबत्त्या, सुगंधी धुपला मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सजावट साहित्याला मागणी

दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टिकर्स, रांगोळीचे रेडिमेड छापेही बाजारात आले आहेत. यात शुभ लाभ, स्वस्तिक, पावले, श्री आदींचा समावेश आहे. पूजेला बसण्यासाठी कॉटन, सिल्क, वेलवेट विविध प्रकारांतील आसने बाजरात आली आहेत. जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्यांना व्यापारीवर्गाकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले.
Pune News: पुण्यात बांधकामांसाठी नियमावली, महानगरपालिकेचे प्रमुख उपाय; वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed