• Sat. Sep 21st, 2024
मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. मराठा समाजातील नेत्यांनी हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला पूर्वीच्या भूमिकेत यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. छगन भुजबळ यांच्यासोबत मला काही बोलायचे नाही. सामान्य मराठा आणि ओबीसी समाज आमच्यासोबत आहे. मला एक माहिती मिळाली ती जर खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. पण मला भेटायला बीडचे काही लोक इथे आले होते. भुजबळांच्या पाहुण्यांचे हॉटेल नातेवाईकांनी फोडले, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचे नेते आंदोलनाला गालबोट लावत आहेत. भुजबळांच्या पाहुण्यांचे हॉटेल नातेवाईकांनी फोडले सत्ताधाऱ्यांचे नेते आंदोलनाला गालबोट लावत आहे. त्यांची घर त्यांच्याच जवळच्याच लोकांनी फोडली. या जाळपोळीशी मराठा समाजाचं देणंघेणं नाही. आपल्या मुलांना खोट्या केसेस करुन अडकवले जात आहे. काही लोक यासाठी प्रयत्न करत आहेत. काही नेत्यांनी बीडमध्ये जाऊन पोलीस अधीक्षकांकडे नावं लिहून दिली आहेत. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे. मराठा मुलांना आत टाका असं सांगितलं जात आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Mumbai News: मराठा समाजातील २१ जणांना शिष्यवृत्ती; परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

तुमचं आरक्षण घटनाबाह्य, मराठ्यांचं आरक्षण हक्काचं: मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात असल्याने मी त्यावर बोलणं योग्य नाही. फेरसर्वेक्षण करुन मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, असा डाव आहे. फेरसर्वेक्षण झाल्यास मराठ्यांच्या आरक्षणाचे पुरावे सापडतील आणि ते द्यावे लागेल. घटनाबाह्य आरक्षण तर ओबीसी समाजाचे आहे. ओबीसी प्रवर्गाचे १६-१७ टक्के आरक्षण घटनाबाह्य आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे.

कोर्टात असल्याने मी माहिती न घेता बोलणं योग्य नाही.फेर सर्वेक्षण करायचं नाही.आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही.मराठ्यांचे आरक्षण इथेच आहे.त्यांचे पुरावे सापडले तर आरक्षण द्यावाच लागेल.काल शिंदे समितीने घेतलेल्या मीटिंगमध्ये आम्हाला कामाच्या अहवाल संदर्भात सांगितले. राज्याच्या विविध भागांमध्ये नोंदी मिळत आहे त्यांनी सांगितले, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, पुढे काय घडणार?

छगन भुजबळ कसं बोलत होते, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे मराठे मागे हटत नाहीत, हे त्यांना माहिती आहे. आपण थोडा थयथयाट करुन बघू, मराठा थांबतील, असा भुजबळांचा प्रयत्न आहे. भुजबळांना ज्या गृहमंत्र्यांनी त्यांना खुर्चीवर बसवलं त्यांच्या गृहखात्याविषयी छगन भुजबळ आरोप करतात. आतापर्यंत त्यांना ज्यांनी मंत्रिपदाचा घास दिला त्यांच्यावियी ते नेहमीच बोलत आले आहेत. पण या सगळ्याने माझं लक्ष विचलित होणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed