• Sat. Sep 21st, 2024

विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचताना कोसळला, परत उठलाच नाही; तरुणाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट

विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचताना कोसळला, परत उठलाच नाही; तरुणाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव येथे काल रात्री जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीत सहभागी तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. खामगाव येथील सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन समोर सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान ही दु:खद घटना घडली. हातातोंडाशी आलेला लेक गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रेखा प्लॉट भागातील रहिवासी युवराज सुरेश यादव (वय २५ वर्षे) वैष्णवी जगदंबा उत्सव मंडळाच्या बँजो पार्टी सोबत निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणुकीत नाचत असताना तो अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच या मार्गावरील सर्व मंडळांनी डीजे बंद केले.

मिरवणुकीत युवराज कोसळल्यानंतर माँ जगदंबा उत्सव मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर युवराजचा मृतदेह स्थानिक सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे प्रचंड गर्दी झाली होती. युवराज यादवच्या पश्चात आई दोन भाऊ दोन बहिणी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाअसून रेखा प्लॉट भागात शोककळा पसरली आहे.

युवराजच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का पोहोचल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा सामान्य रुग्णाला परिसरात होती. अनेक वेळा कोणत्याच नियमाचे पालन न करता मिरवणुकी दरम्यान डीजे कर्कश आवाजात वाजवला जातो. अशा प्रकारच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. पण त्यापासून कोणते धडे घेतले जात नाहीत. नियम धाब्यावर बसवले जात असताना अशा घटनांना आमंत्रण मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed