आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी राहुल गांधी यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी मोलाची मदत करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
“महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता म्हणजेच अजित पवार यांचा FIR घेतला जात नाही याचं राहुल गांधी यांचा आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण तो पोहोचलाय का? पोहचला असेल तर तो स्वीकारला का जात नाही? असा प्रश्न केल्यानंतर ते म्हणाले त्याबाबतीत आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. तेलगू देसम पार्टी, VSR आणि वी के सिंग यांचं आर्थिक आणि वैयक्तिगत जे नातं आहे, त्याबद्दलची माहिती त्यांना सांगितली. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की, काँग्रेस पक्षाकडून किंवा त्यांच्याकडून जी काही ताकद लागेल किंवा मदत लागेल ती पूर्णपणे आम्ही करु. त्यांनी मला पुढच्या दोन दिवसांत काय करु याबाबत एक शब्द दिला आहे. पण मी दोन दिवसांत तुम्हाला याबाबतची माहिती आपल्याला देईन. राहुल गांधी यांच्याकडून अतिशय महत्त्वाची मदत होईल, असं आम्हाला वाटतं. दोन दिवसांत ती काय गोष्ट होती आणि काय मदत झाली, याबाबत मी नक्की सांगेन”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार काय-काय म्हणाले?
“DGCA च्या अंतर्गत जेव्हा AAIB तपास करते तेव्हा कलम 11 आणि 12 च्या अंतर्गत तपास केला जातो. कलम 11 च्या अंतर्गत जो तपास होतो त्यामध्ये जे अधिकारी असतात ते त्याच विभागाचे असतात. त्यामुळे ते खूप खोलात जावून आणि पारदर्शकतेने तपास करतील, असं नाही. कलम 12 अंतर्गत आपल्याला एक वेगळी कम्युनिटी निर्माण करता येते. त्यामध्ये LOP म्हणजे देशाचे जे विरोधी पक्षनेता आहेत त्यांना विनंती करता येते की, त्याचं अध्यक्षपद घेता येतं. याबद्दल राहुल गांधी यांना माहिती दिली. त्याबद्दल सुद्धा आपल्याला खोलात जावून विषय समजून घ्यावा लागेल”, असं रोहित पवार म्हणाले.
राहुल गांधी रोहित पवारांना काय म्हणाले?
“राहुल गांधी यांच्याकडून मला एवढंच सांगण्यात आलं की, आता भारताला इंधनाची मोठी अडचण आलेली आहे. तो मुद्दा आम्ही कालच्या बैठकीत घेतला आहे. जर हाही मुद्दा त्या बैठकीत घेतला तर दोन्ही विषयांकडे लक्ष जाणार नाही. त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्याने हा विषय घ्यावा लागेल. अजित पवार यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस सुद्धा लढेल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
‘महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला नाही’
“महाराष्ट्राकडून अजूनही प्रस्ताव सीबीआयकडे पाठवला गेलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीबीआयने करावा, असा प्रस्ताव पाठवू. पण तो प्रस्ताव अजून पाठवलेला नाही. प्रस्ताव पाठवण्यासाठी अजित पवारांच्या प्रमुखांनी विनंती केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी स्मरणपत्र देखील पाठवलं आहे. स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव दिल्लीला येत नसेल तर सत्तेत असणारी लोकं अजित पवारांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात ताकद दाखवत आहेत?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
“अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावेळी बिहार सरकारने सीबीआयकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंजूर झाला होता. पण अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्रस्ताव पाठवलेला नाही. 26 दिवस झाले तरी महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे क्रिमिनल इनव्हेस्टीगेशनचा प्रस्ताव पाठवलेला नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
