• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यात खरेदीला जाताय? पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय, ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद…

    पुण्यात खरेदीला जाताय? पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय, ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद…

    पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल असते. यामुळे पुण्यातील नेहमीच गजबजलेला असलेला लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुक पुणे पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक दिवाळीपर्यंत बंद राहणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आल आहे.

    पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे. त्यामुळे पुण्यात दिवाळी सारखा सण हा मोठा दणक्यात साजरा केला जातो. सोबतच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात वाहतुकीची समस्या भेडसावते. त्यामुळे नागरिकांना दिवाळीची खरेदी करण्यासाठी कुठलाही खोळंबा होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    Thane Traffic Update: दिवाळीच्या निमित्ताने ठाण्यात वाहतुकीत बदल, ‘या’ रस्त्यांचा करा वापर
    लक्ष्मी रस्त्यावर कपडे, सोने व अन्य महत्त्वाची दुकाने आहेत. त्यात लक्ष्मी रस्ता हा निमुळता असल्याने येथून जाणं-येणं जिकरीचं होऊन जातं. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. वाहन बंद केल्याने या रस्त्यावर आता हजारोच्या संख्येने नागरिक आपल्याला पायी चालताना पाहायला मिळतील. या निर्णयाचा पुणेकरांनी स्वागत केला असून वाहतूक कोंडीचा त्यांना आता काहीसा सामना करावा लागणार नाही.

    Maratha Reservation :मराठा आरक्षण आंदोलन पेटलं, पुण्यात मुंबई बंगळुरु महामार्ग रोखला, नवले पुलावर टायर पेटवले
    पुण्यातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

    • लक्ष्मी रोड, टिळक रोड, तुळशीबाग रोड
    • लक्ष्मी रोडकडे जाणारा बाजीराव रस्ता बंद
    • टिळक रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed