• Sat. Sep 21st, 2024

बेरोजगार तरुणाने यूट्युबवरुन घेतले चेनस्नॅचिंगचे धडे, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत

बेरोजगार तरुणाने यूट्युबवरुन घेतले चेनस्नॅचिंगचे धडे, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: यूट्युबवरील व्हिडीओ बघून चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. कुणाल विठ्ठलभाई वडवाले (वय २७, मूळ रा. कारंजा लाड, सध्या रा. पांढराबोडी) असे अटकेतील लुटारूचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा कामाचा शोधात नागपुरात आला. तो पांढराबोडी येथील नातेवाइकांकडे थांबला. त्याला काम मिळाले नाही. यूट्युब बघताना त्याला चेनस्नॅचिंगची घटना दिसली. ही चित्रफीत त्याने वारंवार बघितली. त्यावरून त्याने चेनस्नॅचिंगचा कट आखला.

प्रेमा संजय जामगडे (वय ४७, रा. सुरेंद्रनगर) या ३१ ऑक्टोबरला पायी देवननगर येथील यवतमाळ अर्बन बँकेत आरडी जमा करण्यासाठी जात होत्या. सुरेंद्रनगर परिसरात मोटारसायकलवर आलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

एक प्रशासकीय चूक अन् ८३ वर्षीय आजींची पायपीट; पेन्शन बंद झाल्यानं उदरनिर्वाह करणं कठीण

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण पांडे, साहाय्यक निरीक्षक संदीप मिश्रा, हेडकॉन्स्टेबल दिलीप चव्हाण, सतीश ठाकूर, जाहीद अन्सारी, जितेंद्र, शेरसिंग व अमोल यांनी सीसीटीव्हीच्या आधारे लुटारूचा शोध सुरू केला. पोलिसांना मोटारसायकलचा क्रमांक दिसला. पोलिस मोटारसायकल मालकापर्यंत पोहोचले.

घटनेच्या दिवशी कुणाल हा मोटारसायकल घेऊन गेल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. मंगळसूत्र मणप्पुरम गोल्डमध्ये ४७ हजार रुपयांना गहाण ठेवले असून, त्याद्वारे मोबाइल व कुटुंबातील सदस्यांसाठी दिवाळीनिमित्त कपडे खरेदी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मोबाइल व मोटारसायकल जप्त केली. झटपट पैसे कमविण्यासाठी त्याने चेनस्नॅचिंग केली.

शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’बाहेर चाहत्यांची गर्दी, ३४ मोबाईलची चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed