जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार हृदयाच्या संबंधित त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संध्याकाळपर्यंत त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
एकनाथ खडसे यांच्या शनिवारी रात्रीपासून छातीत दुखत होते. त्यामुळे नियमित तपासणी करण्यासाठी ते आज मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते. या दरम्यान तपासणीत डॉक्टरांना त्यांच्या शारिरिक हालचालीत काही बदल आढळून आले. शहरातील रुग्णालयात त्यांच्या तपासण्या करण्यात येत असून त्यांना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविण्यात येणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या एक जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथाभाऊ आज नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणीवेळी अहवालात काही बदल आढळून आल्याने खडसे यांच्यावर तेथील वैद्यकीय चमूने उपचार सुरू केले. जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
खडसेंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे देखील रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत. रुग्णालयात आल्याबरोबर त्यांनी येथील डॉक्टरांशी चर्चा केली.