• Wed. Mar 18th, 2026

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

    Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी पाच वाहने एकमेकांना धडकल्यामुळे एक कंटेनर चारचाकीवर उलटला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन ,रायगड: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात एकूण पाच वाहनांची धडक झाली असून, त्यामुळे महामार्गावर बराच वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या सुरू झालेल्या बोगद्याच्या खोपोलीकडील एक्झितवर हा अपघात झाला. यावेळी पाच वाहनांच्या धडकेत एक कंटेनर एका चारचाकीवर पलटल्यामुळे गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना 9.40 दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    Maharashtra TimesMumbai Local: मोटरमन स्टेशनच विसरला, ट्रेन वेगाने पुढे, प्रवाशांमध्ये गोंधळ; मुंबई लोकल स्टेशनवरील घटनेची चर्चा

    गाडीवर कंटेनर पालटला

    पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, एका वेगवान कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून पुढील वाहनांना धडक दिली. त्या नंतर पुढील सर्व वाहनं एका मागोमाग एक धडकू लागली. यावेळी एका इनोवा गाडीवर तो कंटेनर जाऊन पलटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. घटनास्थळी त्वरित बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, हेल्प फाउंडेशन यांच्या टीमने बचाव कार्य सुरू केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहचली असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.

    काही काळ वाहतूक ठप्प

    पोलीसांनी अपघाताची प्राथमिक कारणे तपासण्यास सुरुवात केली असून, मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी तैनात सुरक्षा व बचाव कर्मचारी नागरिकांना सुरक्षित पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. अपघाताच्या जागी मृतक आणि जखमींची माहिती गोळा करून, त्यांच्या ओळखीची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सदर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक थांबलेली होती. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अपघातस्थळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या बचाव आणि सुरक्षा टीमने जखमींना रुग्णालयात हलवून त्वरित उपचाराची व्यवस्था केली.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या कामांमुळे घराला तडे, रात्रभर आवाजामुळे झोपमोड; हैराण नागरिकाची हायकोर्टात धाव

    पोलीसांच्या प्राथमिक माहितीप्रमाणे, ही दुर्घटना वाहन धडक आणि रस्त्यावरील गतीने संबंधित असल्याचे दिसते. मृतकांच्या कुटुंबीयांना ही दुर्दैवी घटना गंभीर धक्का पोहचवली असून, पोलीस प्रशासन पुढील तपास आणि मृतकांची ओळख पटविण्याच्या कामात पूर्ण लक्ष देत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा