• Sat. Sep 21st, 2024
एक प्रशासकीय चूक अन् ८३ वर्षीय आजींची पायपीट; पेन्शन बंद झाल्यानं उदरनिर्वाह करणं कठीण

नागपूर : प्रशासकीय कामातील लेटलतिफीचा अनुभव सर्वांनीच घेतला असेल. मात्र, एका ८३वर्षीय ज्येष्ठ महिलेला नागपूर महालेखाकार कार्यालयाच्या चुकीमुळे वर्षभरापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तीवेतन वर्धा येथून नाशिकला हस्तांतरित व्हावे यासाठी या महिलेने अर्ज केला होता. मात्र, नागपूर एजी कार्यालयाने प्रकरण मंजूर करून चुकीने कागदपत्र मुंबईऐवजी वर्ध्याला पाठविले. चूक लक्षात येऊनही ती दुरुस्त करण्याऐवजी ज्येष्ठ महिलेलाच पुढील प्रक्रिया करण्याचा सल्ला एजी कार्यालयाकडून देण्यात आला.

-सध्या नाशिक येथे राहणाऱ्या शकुंतला सुरोसे यांचे कुटुंब निवृत्तीवेतन ११ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

-वार्धक्यासह अस्थमा आणि इतर व्याधींवरील उपचार कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

-‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम शासनाकडून राबविले जात असताना एका वृद्धेला होत असलेला हा मनस्ताप चीड आणणारा आहे, असा रोष शकुंतला यांचा मुलगा प्रकाश यांनी व्यक्त केला.

दुर्घटनेवेळी विलंबाची आपत्ती, प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे बचावकार्यास अडथळा

असा झाला पत्रव्यवहार

-वर्धा येथून मंडळ अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या त्र्यंबक सुरोसे यांचा ३१ मार्च २०२२ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शकुंतला या नाशिक येथे मुलाकडे राहायला गेल्या.

-फॅमिली पेन्शन नाशिकला हस्तांतरित करावे, यासाठी त्यांनी वर्धा कोषागार कार्यालयाकडे २८ नोव्हेंबर २०२२ रोजी अर्ज केला.

-गेल्यावर्षी ३ डिसेंबरला हा अर्ज नागपूर महालेखाकार कार्यालयाकडे (एजी) पाठविण्यात आला.

-१७ एप्रिल २०२३ रोजी प्रकरण मंजूर झाले असून मुंबई ‘एजी’ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नागपूर एजी कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसे पत्रच शकुंतला यांना देण्यात आले.

इंडिया आघाडीला नमनालाच अपशकून, समाजवादी-‘आप’ची वेगळी चूल; काँग्रेस बंडखोरांनाच दिली उमेदवारी

-प्रकाश यांनी आपल्या थकलेल्या आईला घेऊन मुंबई कार्यालयात सहावेळा चकरा मारल्या. मात्र, ‘आमच्याकडे पत्र आलेच नाही’, असे उत्तर देण्यात आले.

-अखेर हे प्रकरण एजी कार्यालयाच्या चुकीने वर्धा कार्यालयाला पाठविण्यात आल्याचा शोध लागला.

-नागपूर एजी कार्यालयाला याबाबत कल्पना दिली असता त्यांनी ‘वर्धा येथून कागदपत्रे गोळा करून मुंबईला घेऊन जा’, असा सल्ला दिला.

-वर्धा कार्यालयाने मात्र कागदपत्र वैयक्तिक देता येत नसल्याचे उत्तर दिले.

-‘मटा’ने नागपूर एजी कार्यालयातील वरिष्ठ लेखाकार नागराजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘वर्धा येथून कागदपत्रे गोळा करून मुंबईला पाठवावी लागतील’, असे सांगितले. हे काम एजी कार्यालयाचेच असून ही प्रक्रिया त्यांनीच करावी, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

सनद देण्यासाठी अधिकाऱ्याची दिरंगाई, कार्यालयाबाहेर शेतकऱ्याचं आंदोलन

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed