• Sat. Sep 21st, 2024

कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या या अवैध शेतीने परिसरात खळबळ उडाली आहे.

जालन्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन खामगळ यांना गांजा लागवडीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड केली होती. शेतकरी गांजा लागवड करुन त्याचे संवर्धन आणि जोपासना करत आहे अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.

पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द, पण कोणत्या संघाला किती गुण मिळाले जाणून घ्या…
या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक आणि भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाचे अधिकारी देखील सोबत होते. कृषी विभागाचे अधिकार्‍यांसह शासकीय पंचानी खानापूर शिवारात छापा मारला.त्यावेळी खानापूर शिवारातील गट क्रमांक १३२ मधील शेतकरी ज्ञानदेव भिवसन शिंदे यांनी कपाशीच्या शेतात अवैध गांजाची झाडे लागवड केली. हा शेतकरी गांजा संवर्धन करीत असल्याचे दिसून आल्याने पथकही अचंबित झाले.त्यानंतर या पथकाने त्यांच्या शेतातून एकुण ७०.९८ किलो ओला गांजा तसेच गांजाची २३ झाडे असा एकूण ७ लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Semi-Final: वर्ल्डकप २०२३ची मोठी बातमी; मॅच न खेळता हा संघ पोहोचला सेमीफायनलमध्ये, विजय पाकिस्तानचा फायदा पाहा कोणाला?
या शेतकर्‍ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ,नायब तहसीलदार आकाश अनिल चव्हाण, कृषी सहायक विजय जाधव, तलाठी नारायण डाके, कनिष्ठ सहाय्यक सिध्देश्वर बोर्डे, पोलीस कर्मचारी पंडीत गवळी,गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, दिनकर चंदनशिवे,अशोक घोंगे,संजय बेडवाल, होमगार्ड रामेश्वर घोडके, राहुल खरात, कैलास दुधाणे, राहुल मघाडे, धम्मदीप आढावे,प्रकाश भुतेकर यांनी केली आहे.

चौथ्या विजयानंतर पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed