• Sat. Sep 21st, 2024
जालन्यात १२ क्विंटल धान्य जप्त; पुरवठा विभागाची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

जालना: काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे स्वस्त दुकानातील १२ क्विंटल धान्य पुरवठा विभागाने कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाडीसह, स्वस्त धान्य आणि चालकाला ताब्यात घेतले असून गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीची ऑनलाईन विक्री; तरुणाची ट्रायल मागणी, तरुणीचा होकार, नंतर पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?
गोरगरिबांना वेळेवर अन्नपुरवठा व्हावा आणि दोन वेळचे जेवण पोटभर मिळावे, यासाठी सरकार कटीबद्ध आहे. वेगवेगळ्या योजना सरकार राबवत आहे. तरी या योजना गोरगरिबांपर्यंत न जाता मध्येच कुठे गहाळ होत असल्याचा प्रश्न नेहमी सर्वसामान्यांना पडत असतो. तर त्यावर भलतेच आपले घर भरत आहे. असाच एक प्रकार जालना जिल्ह्यातील हिसवण खुर्द या गावामध्ये उघडकीस आला आहे. हिसवन खुर्द येथील रेशन दुकानदार हा गोरगरिबांसाठी शासनाने दिलेला रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती.

गैरसमज दूर करण्याचा केला प्रयत्न, प्रकाश सोळंके मनोज जरांगेंच्या भेटीला

या माहितीवरून पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन स्वस्त धान्य दुकानासमोर काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या माल गाडीसह धान्य जप्त केला आहे. यामध्ये पुरवठा विभागाने तात्काळ संबंधित गाडी चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून गाडीसह रेशनचे १२ क्विंटल धान्य जप्त केला आहे. ऐन दिवाळी सणात गोरगरिबांच्या तोंडाचा घास पळवण्याचा कट पुरवठा विभागाच्या कारवाईने उघड झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed