• Sat. Sep 21st, 2024

मुलांच्या लग्नासाठी स्वस्त सोन्याची खरेदी, व्यापाऱ्याकडून रक्कम घेताच पोलीस छाप्याचा बनाव, नेमकं काय घडलं?

मुलांच्या लग्नासाठी स्वस्त सोन्याची खरेदी, व्यापाऱ्याकडून रक्कम घेताच पोलीस छाप्याचा बनाव, नेमकं काय घडलं?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गुजरात येथील एका कापड व्यापाऱ्याला बाजारमूल्यापेक्षा कमी दरात सोने खरेदी करणे चांगलेच महागात पडले. दोन मुलांच्या लग्नासाठी ५०० ग्रॅम सोने देताना व्यापाऱ्याकडून वीस लाख रुपये घेण्यात आले. याचवेळी पोलिसांचा छापा पडल्याचे भासवून तोतयांनी सोने आणि पैसे दोन्ही घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यापाऱ्याने कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

गुजरात येथील एका कापड व्यापाऱ्याच्या मुलाचे आणि मुलीचे लग्न ठरले होते. डिसेंबर महिन्यात २१ आणि २२ तारखेला त्यांचे लग्न करण्याचे ठरले होते. या दोन्ही लग्नात दागिने बनविण्यासाठी व्यापाऱ्याला ५०० ग्रॅम सोन्याची गरज होती. बाजारात सुमारे ६३ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम असा सोन्याचा दर असल्याने व्यापाऱ्याने आपल्या परिचयातील व्यक्तींना स्वस्त सोन्याबाबत विचारणा केली. एका व्यक्तीने मुंबईतील एकाचे नाव सांगितले. व्यापाऱ्याने मुंबईतील तरुणाला संपर्क केल्यानंतर त्याने आणखी दोन चार जणांची नावे सांगितली.

एक मराठा कोटी मराठा, विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेतच पानभर लिहून ठेवलं, काय आहे कारण?

४५ हजार रुपये प्रति दहाग्रॅम दराने सोने मिळेल असे या सर्वांनी सांगितले. मात्र ५०० ग्रॅम खरेदी करायचे असल्याने व्यापाऱ्याने दर कमी करण्यास सांगितले. तडजोडीअंती ४० हजार प्रति दहा ग्रॅम या दराने सोने देण्याचे ठरले. चार ते पाच जणांनी व्यापाऱ्याला १ नोव्हेंबर रोजी वीस लाख रुपये घेऊन मुंबईत बोलावले. व्यापारी आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांसह गुजरातहून मुंबईत आला. आधी कुर्ला येथे आणि नंतर त्याला ऐरोली येथे बोलाविण्यात आले. रिक्षातून काहीजण सोन्याची बिस्किटे घेऊन आले.

जवळपास २० बिस्किटे पिशवीत होती. व्यापाऱ्याने केवळ पाच बिस्किटे हवी असल्याचे सांगितल्यावर इतर बिस्किटे दुसऱ्याला द्यायचे असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्याने वीस लाख रुपये दिले आणि पुढे जाऊन सोने घ्या, असे त्याला सांगितले. रिक्षातून जात असताना कारमधून आलेल्या दोघांनी रिक्षा थांबवली. पोलिस असल्याचे सांगून सोन्याची बिस्किटे असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार पसार झाला तर व्यापाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पैसे आणि सोने घेऊन गेल्यानंतर व्यापाऱ्याने सर्वप्रथम संपर्क केलेल्या तरुणाला फोन लावला तर त्यानेही मोबाइल बंद ठेवला होता.

दरवाजाची कडी तोडून चोर घुसले, वृद्धेश्वर मंदिरात दानपेट्यांची चोरी; घटना सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed