• Sat. Sep 21st, 2024
मराठा आरक्षणासाठी कँडल मार्च; नंतर तरुण घरी गेला, अन् अचानक घेतला टोकाचा निर्णय

सोलापूर: बार्शी तालुक्यातील देवगाव येथील रणजीत मांजरे नावाच्या २५ वर्षीय युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या युवकाला बार्शी येथील डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांने तरुणावर उपचार करून त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे. रणजीत मांजरे याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आंदोलनादरम्यान दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी, आंदोलकांविरोधात कारवाईचा बडगा, ४१ जण अटकेत
मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर सुरू आहे. खेड्यातील मराठा समाज देखील विविध मार्गाने मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. बार्शी तालुक्यातील देवगाव मध्ये महिलांनी आणि पुरुषांनी मंगळवारी सायंकाळी गावात कँडल मार्च काढला होता. कँडल मार्च संपल्यानंतर रणजित मांजरे या युवकाने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रणजित मांजरे याने कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे समजताच त्याला ताबडतोब तालुक्यातील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन तरुणाची समजूत काढली.

मुख्यमंत्र्यांनी फोनवर समजूत काढली, रात्री ११ नंतर मराठा बांधवांचं जलसमाधी आंदोलन अखेर मागे

बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रणजित मांजरे यांची भेट घेत विचारपूस केली. हॉस्पिटल प्रशासनाला मांजरे यांच्या नातेवाईककडून कोणत्याही प्रकारची बिल न घेता सर्व बिल माझ्याकडून घ्यावे, अशा सूचना दिल्या. याप्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. परंतु युवकांनी असे कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये, अशा प्रकारची विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा युवकांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed