• Mon. Nov 25th, 2024
    गर्लफ्रेंडला घाबरवण्यासाठी पिस्तूल बाहेर काढणे पडलं महागात, चुकून एक राउंड फायर; नंतर जे घडलं…

    नवी मुंबई : प्रेमसंबध असलेल्या बारबालेला घाबरवण्यासाठी पिस्तूल काढणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. अवैद्य पिस्तूल घेऊन तरुणाने बारबालेसोबत झटापटी केली. त्या पिस्तूलमधून चुकून सुटलेली गोळी त्याच्याच पोटात लागल्याने तो जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील क्रेझी बॉईज या बारमध्ये नुकतीच घडली आहे. निलेश शिवाजी घरत असं या तरुणाचं नाव आहे.

    या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी निलेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोळीबारामुळे जखमी झाल्यानंतर निलेश डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. या घटनेत जखमी झालेला निलेश घरत हा कल्याणमधील खोणी परिसरात राहण्यास असून त्याचे पनवेलमधील कोनगाव येथील क्रेझी बॉईज या बारमधील एका बारबालेसोबत प्रेम संबंध जडले होते.

    Team India: आता थेट सेमीफायनलमध्ये भेटू; एका रिपोर्टने भारतीय संघात अस्वस्थता, रोहितसाठी निर्णायक काळ
    १५ दिवसांपूर्वी निलेशने आपल्या प्रेयसी बारबालेला चार ते पाच वेळा फोन केला होता. मात्र, सदर तरुणीला कामात असल्यामुळे निलेशचे फोन घेता आले नाहीत. मात्र, थोडया वेळानंतर या तरुणीने निलेशला फोन केल्यानंतर त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर या दोघांनी एकमेकांशी अबोला धरला. २७ ऑक्टोबर रोजी रात्री निलेश क्रेझी बॉईज बारमध्ये दारु पिण्यासाठी गेला होता. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बारमध्ये प्रेयसी तरुणी स्टेजवर उभी असताना निलेशने तिच्याजवळ जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने तरुणीला दोन तीन चापटा देखील मारल्या.

    त्यावेळी बारमधील वेटर आणि मॅनेजर निलेशला समजावत असताना निलेशने तरुणीला पाठीमागून पकडून मिठी मारली. त्यानंतर त्याने तिला घाबरवण्यासाठी उजव्या हाताने कमरेला खोचलेले आपल्या जवळचे अवैद्य पिस्तूल काढले. त्यावेळी झालेल्या झटापटीत निलेशकडून चुकून पिस्तूलमधून एक राऊंड फायर झाल्याने गोळी त्याच्या पोटात लागल्याने तो जखमी झाला. त्यामुळे त्याने आपल्या सहकाऱ्यांसह बारमधून पळ काढला.

    निलेश डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी दुपारी निलेश विरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप निलेश रुग्णालयात दाखल असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. निलेशने सदरचे अवैद्य पिस्तूल कुठून व कशासाठी आणले? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.
    वर्ल्ड कप जिंकायला आलेल्या संघावर नामुष्कीची वेळ, आता खेळायला राखीव खेळाडूही शिल्लक नाहीत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed