महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. मात्र, हा वाडा आता मोडकळीस आला आहे. त्यामुळे त्याचे स्मारक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, त्याला जागामालक व पोटभाडेकरूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढत महापालिकेने यापूर्वी केलेल्या निवाड्यानुसार तसेच २०१३ मधील कायद्यानुसार जागेचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. मात्र, संभाव्य कायदेशीर अडचणींचा विचार करत सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली. तसेच भूसंपदानासाठी पुढील कार्यवाही देखील सुरू केली.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात रहिवासी आणि व्यावसायिकांनी काल सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. न्यायालयाने संध्याकाळी उशिरा अपील दाखल करून घेतले. भिडे वाड्यातील रहिवासी आणि व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. महापालिकेने पूर्वीच कॅव्हेट दाखल केले आहे. या प्रकरणी आम्ही माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News