• Sat. Sep 21st, 2024

रिसॉर्टमध्ये गैरकृत्य सुरू होतं; पोलिसांना माहिती मिळाली, छापा टाकला अन् २१ जणांविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?

रिसॉर्टमध्ये गैरकृत्य सुरू होतं; पोलिसांना माहिती मिळाली, छापा टाकला अन् २१ जणांविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?

सातारा: पेट्री येथील राज कास हिल रिसोर्ट नावाच्या हॉटेलमधील हॉलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा १८ तरुणांसमवेत सहा बारबालांना संगिताच्या तालावर उत्तान कपड्यात हावभाव, अंगविक्षेप करून नृत्य करीत असताना सातारा पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
बहिणीसह भाच्याला लोखंडी रॉडने मारहाण; महिलेचा दुर्दैवी मृत्यू, भावाच्या कृत्यानं परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माहितीच्या आधारे पेट्री या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना दिले होते. त्यानुसार घोडके यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह राज कास हिल रिसोर्टमध्ये दि. २८ ऑक्टोबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. रिसोर्टमधील हॉलमध्ये सहा बारबाला बसलेल्या १८ पुरुषांसमोर आळी पाळीने येऊन उत्तान कपड्यात त्यांच्याशी लगट करत होत्या.

बारबालांच्या या कृत्यावर लोक आनंद घेऊन बारबालांवर भारतीय चलनातील नोटा उडवित होते. हॉलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करत असलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ लोकांकडून ८२ हजार ६९८ रुपये रकमेचा माल जप्त केला. त्यात रोख रक्कम आणि मोबाईल हॅण्डसेट जप्त केले आहेत. तसेच हॉलमधील जीबीएस कंपनीचा साऊंण्ड सिस्टीम व डिस्को लाईटही जप्त केली आहे. याबाबत राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर, वेटर्स आणि १८ गिऱ्हाईकांसह एकूण २१ आरोपी विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

देवाचा जप करत नाही तेवढा माझा करतात; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक डी. ए. दळवी, महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, पोलीस नाईक किरण जगताप, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नीलेश यादव, पोलीस हवालदार महांगडे, पोलीस कॉन्स्टेबल बामणे यांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed