• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणावर पुढील २ दिवसात निर्णय होण्याची शक्यता; मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे वक्तव्य

    तुळजापूर: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कळकळीने लक्ष ठेऊन आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश हे त्या त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत आहेत. वॉर फुटींगवर काम चालू आहे. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर साधक बाधक विचार महाराष्ट्र शासन करत आहे. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री हे उपोषणावर यावर लक्ष ठेऊन आहेत. यावर लवकरच निर्णय होईल. तसेच येत्या एक दोन दिवसात निर्णय होईल, अशी मला आशा आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
    मराठा आरक्षण मुद्यावरून राज्यात नेत्यांना गावबंदी, मात्र नगरमध्ये वेगळंच चित्र, नेमकं काय घडलं?तुळजापूर येथे कालपासून महाआरोग्य शिबीर घाटाच्या पायथ्याशी सुरु आहे. या शिबिराचा कालपासून १/२ लाख लोकांनी लाभ घेतल्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सांगितलं. आज ते तुळजापूर येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरास भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांजवळ बोलत होते. मराठा आंदोलक घेरतील म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी ढेकरी रोड येथील खंडोबा मंदिर जवळ नव्याने हेलिपॅड बनवले होते. आंदोलकांना चकवा देण्यासाठी हि खेळी प्रशासनाकडून खेळली गेली आहे. नळदुर्ग रोड येथे मोठे हेलिपॅड असताना केवळ आंदोलकर्त्यांनी गोंधळ करु नये म्हणून खंडोबा मंदिरशेजारी नव्याने हेलिपॅड बनविण्यात आले होते.

    एकनाथ शिंदे कणेरी मठात; कोल्हापूरच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता

    तुळजापुर येथे कालपासून घाटाच्या पायथ्याशी महाआरोग्य शिबीर चालू आहे. हे शिबीर पाहण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे आज हेलिकॉप्टरने आले होते. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला आहे. मनोज जरांगे पाटील आंतरवेली सराटी येथे २५ आँक्टोबरपासुन बेमुदत उपोषणास बसले आहेत. राज्यातील नेत्यांना मराठा आरक्षणाबाबत राज्यातील आंदोलकांकडून जाब विचारला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या शहरात गाव खेडयात साखळी उपोषणे सुरु आहेत. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed