• Sat. Sep 21st, 2024
राज्यात नेत्यांना गावबंदी; मराठा समाजाच्या आंदोलकांची दादा भुसेंना भीती? बैठकीकडे फिरवली पाठ

धुळे: मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण जाहीर केले जात नाही तो पर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना प्रवेश बंदी करण्यात येईल, असे मराठा समाजाने जाहीर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर सध्या साखळी उपोषण आंदोलन सुरू असून धुळे शहरात देखील मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन सुरू झाले आहे.
मराठा आरक्षणावर पुढील २ दिवसात निर्णय होण्याची शक्यता; मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे वक्तव्य
या आंदोलनादरम्यान राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज धुळे शहरातील ऋतुराज हॉटेल येथे एका कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात नियोजित बैठकीसाठी मंत्री दादा भुसे येणार होते. मात्र मराठा समाजाने गाव बंदीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर मंत्री दादा भुसे हे या बैठकीसाठी हॉटेलवर आलेच नाहीत. धुळे शहरातील ऋतुराज हॉटेल येथे मराठा समाज क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा आम्ही इशारा दिलेला होता. मात्र आमच्या आंदोलनाबाबत माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी पळ काढण्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे कणेरी मठात; कोल्हापूरच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांचे आंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला धुळे सकल मराठा समाजानेही पाठींबा दिला असून साखळी उपोषणास सुरुवात केलेली आहे. सरकार आरक्षणाच्या संदर्भात सरकार जोवर ठोस निर्णय घेत नाही तोवर धुळे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्री, आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी सकल मराठा समाजाने जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed