• Sat. Sep 21st, 2024

मी पुन्हा येईनच्या व्हिडिओनंतर ‘भावी मुख्यमंत्री फक्त अजित पवार’, पुण्यात झळकले बॅनर, कुणी लावले?

मी पुन्हा येईनच्या व्हिडिओनंतर ‘भावी मुख्यमंत्री फक्त अजित पवार’, पुण्यात झळकले बॅनर,  कुणी लावले?

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन असा संवाद असलेला व्हिडिओ काल महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या एक्स (ट्विटर) वर पोस्ट करण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, तासाभरानंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र, यामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष नेत्यांनी आताच्या युती सरकला धारेवर धरत टीका सुरू केली होती. ते प्रकरण शांत होत असतानाच पुण्यात अजित पवारच भावी मुख्यमंत्री असतील, असे बॅनर राहुल पायगुडे यांनी लावल्यानं खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र भाजपच्या पोस्टमुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतील आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तो कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न होता, असं म्हणत सर्व चर्चा फेटाळल्या. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. काल रात्रीचं प्रकरण शांत होत असताना पुण्यात पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला फटका? सर्व्हेतील अंदाज काँग्रेसलाही आश्चर्यचकीत करणारा, कुणाची सत्ता येणार?
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कसबा विधानसभा कार्याध्यक्ष राहुल पायगुडे यांनी पुण्यातील लक्ष्मी रोडवर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत.
लातूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मराठा आंदोलकांनी रविकांत तुपकरांना बैठकीबाहेर काढलं, सोफ्यावरुन अक्षरश:उठवलं
विकासाचा वादा अजितदादा! होय म्हणून भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवारच अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. राहुल पायगुडे यांचा रोख नेमका सत्तेत असणाऱ्या इतर दोन पक्षांना इशारा आहे का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्यात आहेत. बॅनर झळवणारे राहुल पायगुडे म्हणले की आमचा त्या ट्विटशी काही संबंध नाही, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भविष्यात २०२४ मध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री बनावे ही आमची इच्छा आहे, म्हणून हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, अजित पवारांचा मोठा निर्णय, अखेर माळेगाव साखर कारखान्यातील कार्यक्रम संपन्न, पण…

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed