• Sat. Sep 21st, 2024

माळेगाव साखर कारखान्यातील कार्यक्रमाला मराठा आंदोलकांची हजेरी, अजित पवारांचा मोठा निर्णय…

माळेगाव साखर कारखान्यातील कार्यक्रमाला मराठा आंदोलकांची हजेरी, अजित पवारांचा मोठा निर्णय…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पार पडणार होता. मात्र, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षाने कार्यक्रमानां उपस्थित राहू नये, असे कारखाना प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्यानुसार मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. सदर कार्यक्रम कारखान्याचा कारखान्याचे चेअरमन, संचालक व मराठा आंदोलक महिलांच्या हस्ते पार पडला.

नेमकं काय झालं….

माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र,कोणत्याही राजकीय नेत्यांनी उपस्थित राहू नये अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कारखाना प्रशासनाला देण्यात आले होते. कालपर्यंत याबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम होते.

आज दि. २८ रोजी शनिवार उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी आंदोलकांशी समन्वय साधत अजित पवारांचे काय म्हणणे आहे. हे आंदोलकांशी बोलताना सांगितले. सकल मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या सर्वांच्याच मागण्या आहेत. अजित दादांनी या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. जे आंदोलन करत आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक द्या.. सन्मानाने त्यांची बाजू ऐकून घ्या.. मी आपल्या पाठीशी आहे.. मोळी पूजनाचा कार्यक्रम सभासदाच्या हस्ते पार पाडावा.. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या..
Ajit Pawar: मराठा आंदोलकांच्या पवित्र्यानंतर अजितदादांचा महत्त्वाचा निर्णय, माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द

पवारांवर निशाणा…

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार अजित पवार या कार्यक्रमाला आले नाहीत. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र ते जरी या कार्यक्रमाला आले नसले तरी आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, तुम्हाला ४० दिवस दिले. सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्या.. अशी भूमिका मांडली होती. परंतु ,सरकार म्हणून तुम्ही अपयशी ठरलेला आहात. अजूनही तुम्ही समाजाच्या भावना तीव्र असताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे वर्तन करत आहात. आज पर्यंत पवार कुटुंबीयांना तालुक्याने डोक्यावर घेतले आहे. मात्र, तुम्ही जर समाजाच्या भावना जाणल्या नाहीत. आरक्षणाचा विषय सोडवत नसाल.. तर येणाऱ्या काळात आम्हाला तुमचाही विचार करावा लागेल, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.
मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला फटका? सर्व्हेतील अंदाज काँग्रेसलाही आश्चर्यचकीत करणारा, कुणाची सत्ता येणार?

छावणीचे रूप..

कारखाना परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण कारखाना परिसराला पोलीस छावणीचे रूप आल्याचे पाहिला मिळाले..
लातूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मराठा आंदोलकांनी रविकांत तुपकरांना बैठकीबाहेर काढलं, सोफ्यावरुन अक्षरश:उठवलं

अजित पवारांच्या येण्यावर मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप; माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमापूर्वी गोंधळ

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed