नाशिक : पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वीरमाळच्या वन विभागाच्या राखीव जंगलात गांजाची शेती आढळली आहे. लागवड करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरमाळ शिवारातील फॉरेस्टच्या मालकीच्या कूप क्रमांक ८५ मध्ये पाहुचीबारी येथील भाऊराव अर्जुन जाधव (७५) याने गांजाची रोपांची लागवड केल्याची माहिती ननाशी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरून त्यांनी जंगलात छापा टाकला असता, फॉरेस्टच्या राबी क्षेत्रात गांजाची लागवड केलेली ५३ रोपे आढळली.

भाऊराव जाधव यास ताब्यात घेतले आहे. ५३ झाडांचे एकूण वजन साडेअठरा किलो आहे. त्याचे सरकारी मूल्य १ लाख ८६ हजार रुपये आहे. पोलिसांनी रोपे जप्त केली आहेत. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. उपनिरीक्षक कपिले यांच्या मार्गदर्शनाखाली पवार आदी करत आहेत.