• Sat. Sep 21st, 2024
छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंगीचा फैलाव; बारा वसाहती रेड झोनमध्ये, आतापर्यंत ३८ रुग्णांना लागण

छत्रपती संभाजीनगर: शहरात डेंगी आजाराचा फैलाव होत आहे. एका वसाहतीत दहा पेक्षा जास्त संशयित रुग्ण आढळल्यास ती वसाहत डेंगी आजारासाठी रेड झोनची वसाहत म्हणून मानली जाते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने बारा वसाहती रेड झोन म्हणून घोषित केल्या आहेत. दरम्यान डेंगी संशयित एका महिला रुग्णाचा शुक्रवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचे प्रशासन अधिकच अलर्ट झाले आहे.
अंगणवाडी मदतनीसांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
डेंगीच्या संशयित आणि पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या शहरात वाढत आहे. आतापर्यंत ३८ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. शुक्रवारी त्यात आणखीन एकाची भर पडली. पहाडसिंगपुरा भागातील एका महिलेचा खासगी दवाखान्यात मृत्यू झाला, ही महिला डेंगी संशयित होती अशी माहिती पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. डेंगीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शहरात विविध वसाहतींमध्ये सर्वेक्षण सुरु आहे.

ज्या वसाहतीमध्ये डेंगीचे संशयित किंवा पॉझिटीव्ह रुग्ण दहा पेक्षा जास्त आढळून येतात त्या वसाहती रेड झोन म्हणून गृहीत धरुन त्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना केली जाते. शहरात बारा वसाहती आतापर्यंत रेड झोन मध्ये आल्या आहेत अशी माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.
जुलै महिन्यात डेंगीचे २२ रुग्ण पॉझिटीव्ह होते आणि ८२ रुग्ण संशयित होते. ऑगस्ट महिन्यात त्यात वाढ झाली, २९ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले तर १०३ रुग्ण डेंगी संशयित आढळून आले. सप्टेंबर महिन्यात ३६ पॉझिटीव्ह तर १०१ संशयित रुग्ण आढळले. २५ ऑक्टोबरपर्यंत ३८ पॉझिटीव्ह तर ६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

प्रेक्षकांना कसा वाटला कंगनाचा ‘तेजस’?

या आहेत रेड झोनच्या वसाहती
हमालवाडा
आयोध्यानगर सिडको एन ७
गरमपाणी
सिडको एन १२ डी सेक्टर
समतानगर
कैलासनगर
मयूरनगर
क्रांतीनगर
हर्सूल सोनारगल्ली
कुंभारवाडा
न्यू हनुमाननगर गल्ली क्रमांक ४ आणि ५
न्यायनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed