पुणे : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीनुसार दररोज पुणे – कोल्हापूर – पुणे अशी विशेष गाडी पाच नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे – कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर, पुणे मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू केली जात आहे. ही गाडी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या काळात पुणे – कोल्हापूर – पुणे अशी दररोज विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला सर्व महत्वाच्या २० रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी प्रवाशांना खूपच फायदेशीर ठरणार आहे. या गाडीला १६ कोच असणार आहेत. या सेवेसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसचा रेक वापरण्यात येणार आहे. पाच नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या गाडीच्या ११४ फेऱ्या होणार आहेत. याबाबतचे नोटीफिकेशन शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने काढले आहे.
गाडीच्या अशा आहेत वेळा
पुणे – कोल्हापूर ही गाडी पुण्यातून रात्री नऊ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. ती गाडी कोल्हापूर येथे पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर, कोल्हापूर येथून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.