• Sat. Sep 21st, 2024
समाजासाठी लढतोय, मला अभिमान, गाडी फोडली म्हणजे मोठा गुन्हा नाही, मंगेशच्या आईची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : “मी सकाळी टीव्ही पाहिला. माझ्या मुलाने मराठा आरक्षणाला नेहमी विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली. तो समाजासाठी लढतोय म्हणून त्याने गाड्या फोडल्या असतील पण म्हणून माझ्या मुलाने फार मोठा गुन्हा केलेला नाही. माझ्या मुलाने केलेल्या या तोडफोडीचं मी समर्थन करते. माझा मुलगा समाजासाठी लढतोय याचा मला अभिमान आहे”, अशा भावना सरपंच मंगेश साबळे याच्या आईने व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप जरांगे पाटील करतायेत. अशा परिस्थितीमध्ये गुणरत्न सदावर्ते म्हणून जरांगेंवरती वेगवेगळे आरोप करत आहेत तसेच त्यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. त्यासोबतच ते आरक्षणाला विरोध देखील करत आहेत. यामुळे मराठा समाजाच्या भावना त्यांच्याबद्दल तीव्र झालेल्या आहेत. सदावर्ते त्यांच्या वक्तव्याचा राग मराठा समाजाच्या तरुणांमध्ये आहे. याच्यातूनच मुंबई येथे सदावर्ते यांच्या घराखाली उभ्या असलेल्या वाहनांची मंगेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तोडफोड केली.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या तरुणाची जोरदार चर्चा, कोण आहे सरपंच मंगेश साबळे?
मराठा समाजाच्या मागण्या सरकार ऐकतच नाही. नेते आरक्षण द्यायला नाही म्हणतात. त्यात सदावर्ते आरक्षणाविरोधोत बोलतात. त्याच्यामुळे आमच्या मुलांना हे पाऊल उचलावं लागलं. माझ्या मुलाने केलेल्या या तोडफोडीचं मी समर्थन करते. मंगेश साबळे हा गेल्या तीन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे. तो समाजासाठी लढत आहे, मराठा समाजाला न्याय मिळावा एवढीच त्याची मागणी आहे, असं मंगेशची आई म्हणालं.

मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडीच्या काचा फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माझ्या मुलाने गाडी जाळली ते बरोबर केलं. मराठा आरक्षणाची मागणी नेतेमंडळी समजून घेत नाही. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. गावातील शेतकऱ्यांना शेतातील विहीर मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत होते. त्यावेळेला माझ्या मुलाने पंचायत समितीमध्ये पैसे उधळले होते. गावातील नागरिकांसाठी देखील तो नेहमी लढत असतो. माझा मुलगा गावकऱ्यांसाठी समाजासाठी लढतो, मला त्याचा अभिमान वाटतो, असंही मंगेश साबळे याच्या आईने आवर्जून सांगितलं.

आधी स्वतःची कार पेटवली, आता सदावर्तेंच्या वाहनाची तोडफोड करणारा मंगेश साबळे नेमका कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed