पुणे : शहरातले वाढते रस्ते आणि वाढत्या वाहनांची संख्या पाहता पोलीस वाहतूक विभागवरचा ताण वाढला आहे. दिवस दिवसभर उन्हात थांबून पोलिसांचे हाल बेहाल होत चालले आहेत. अशातच पुण्यात दुचाकीवर टवाळकी करत फिरणाऱ्यांची संख्याही अधिक झाली आहे. मात्र, पुण्यात ट्रिपल सीट फिरणाऱ्या आर्मी ऑफिसरवर दीड महिन्यांपूर्वी दंडात्मक कारवाई केल्याचा राग डोक्यात ठेवून काल २६ ऑक्टोबर रोजी संबंधित पोलिसाचा शोध घेऊन बदला घेण्याचा उदेशाने त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपी जवानाचे नाव वैभव संभाजी मनगटे (वय २५ रा. मु पो मंगरूळ ता, सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर) असे आहे. तर रमेश ढावरे (वय ३६, नेमणूक फरासखाना वाहतूक विभाग) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपी जवानाचे नाव वैभव संभाजी मनगटे (वय २५ रा. मु पो मंगरूळ ता, सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर) असे आहे. तर रमेश ढावरे (वय ३६, नेमणूक फरासखाना वाहतूक विभाग) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, दीड महिन्यांपूर्वी रमेश ढावरे हे बुधवार चौकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे वाहतूक नियमित करत असताना, वैभव संभाजी मनगटे हे ट्रिपल सीट दुचाकीवर फिरत होते. नियमानुसार वाहतूक पोलीस कर्मचारी रमेश ढावरे यांनी गाडी रोखत नियमितपणे दंडात्मक कारवाई केली. त्यावेळेस दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि वैभव मनगटे तिथून निघून गेला. मात्र याचा राग डोक्यात ठेवून दीड महिन्यानंतर कारवाई करणाऱ्या पोलिसाचा शोध घेतला आणि आरोपी वैभव संभाजी मनगटे याने ढावरे यांच्या डोक्यात ब्लॉक घालत गंभीर जखमी केलं. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News