धुळे: संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी धुळ्यात एका कार्यक्रम दरम्यान बोलताना दिली.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सांगवी हिंसाचारप्रकरणी तेथील पीडित आदिवासींनी आपल्याकडे सविस्तर निवेदन दिल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पोटतिडकीने प्रयत्न करू करू, असेही आमदार डॉ फारुक शाह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. धुळे शहरात अन्सारनगरात एका जलकुंभ कामाच्या शुभारंभप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी आमदार डॉ फारुक शाह म्हणाले की, गेल्या विधानसभा अधिवेशनात आंदोलन केल्यानंतर ‘डीआयजी’ दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत धुळे शहरातील गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले होते. परंतू अद्यापपावतो कोणतीही चौकशी झालेली नाही. कारण चौकशीसाठी नियुक्त केलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी या प्रकरणाची कुठलीच चौकशीच केली नाही. ते करणे गरजेचे समजले नाही.
यासंदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. तसेच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचा हात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबतही आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे धुळे शहराचे आमदार डॉ फारुक शाह यांनी यावेळी बोलताना सांगितले.